तुमची नोंदणी यशस्वीरीत्या झाली आहे.
आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.
अभिनंदन! तुमची नोंदणी यशस्वी झाली आहे.
पुढील माहिती, अपडेट्स आणि सूचना मिळवण्यासाठी तुम्ही ज्या जिल्ह्यात उपस्थित राहणार आहात त्या जिल्ह्याच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर होणारे रोजगार मेळावे
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मागील यशस्वी रोजगार मेळाव्यांतून काही छायाचित्रे
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि युवाशक्ती फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वंचित दुर्लक्षित घटकातील युवकांना 250 पेक्षा जास्त कोर्समध्ये माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देते आहे.
ग्रामीण भागातील युवकांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या संकल्पनेतून या रोजगार अभियानाची सुरुवात झाली.
या उपक्रमात युवाशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 350 च्या वर कंपनीमध्ये 11000 पेक्षा जास्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी विद्यापीठाने विद्यापीठाच्या 8 विभागीय केंद्रात रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. या रोजगार मेळाव्यातून त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी.
खालील नकाशावर क्लिक करून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये होणाऱ्या मेळाव्यांची माहिती मिळवा
महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान होणाऱ्या मेळाव्यांचे तपशीलवार वेळापत्रक
| क्र. | शहर | तारीख | दिवस | वेळ |
|---|---|---|---|---|
| १ | नाशिक | १२ डिसेंबर २०२५ | शुक्रवार | सकाळी १० ते संध्याकाळी 3 |
| २ | अमरावती | २७ जानेवारी २०२६ | मंगळवार | सकाळी १० ते संध्याकाळी 3 |
| ३ | पालघर | ३१ जानेवारी २०२६ | शनिवार | सकाळी १० ते संध्याकाळी 3 |
| ४ | संभाजीनगर | ०६ फेब्रुवारी २०२६ | शुक्रवार | सकाळी १० ते संध्याकाळी 3 |
| ५ | पनवेल | ०८ फेब्रुवारी २०२६ | रविवार | सकाळी १० ते संध्याकाळी 3 |
| ६ | नागपूर | ०६ मार्च २०२६ | शुक्रवार | सकाळी १० ते संध्याकाळी 3 |
| ७ | कोल्हापूर | १३ मार्च २०२६ | शुक्रवार | सकाळी १० ते संध्याकाळी 3 |
| ८ | पुणे | २३ मार्च २०२६ | सोमवार | सकाळी १० ते संध्याकाळी 3 |
| ९ | नांदेड | २७ मार्च २०२६ | शुक्रवार | सकाळी १० ते संध्याकाळी 3 |
रोजगार मेळाव्यात सहभागी होणारे प्रमुख उद्योग आणि औद्योगिक क्षेत्र
रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठीचे पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांची यादी